गुरमीत राम रहिमला मोठा दिलासा; हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता

May 28, 2024 - 15:09
 0
गुरमीत राम रहिमला मोठा दिलासा; हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता

रयाणा : डेरा सच्चा सौदा गुरुमीत राम रहिमच्या यांच्या संदर्भील प्रकरणात न्यालायाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बाबा गुरमीत राम रहीमसह (Ram rahim) चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने (High court) याबाबतच निर्णय दिला आहे.

राम रहिमने सीबीआय न्यायालयाच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर, सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द करत हायकोर्टाने हत्याप्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता केली. 22 वर्षांपूर्वीच्या या खटल्यात 19 वर्षानंतर न्यायालयाने राम रहिमसह 5 जणांची मुक्तता केली.

बलात्कार आणि दोन जणांची हत्या केल्याप्रकरणी 2009 मध्ये सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिम आणि इतर 4 जणांना दोषी ठरुन शिक्षा सुनावली होती. त्यानंतर, 18 ऑक्टोबर 2021 रोजी न्यायालयाने राम रहिमसह इतर चौघांना रंजीत सिंह हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यासंदर्भाने, राम रहिमने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, आज हायकोर्टाने राम रहिमसह चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे.

आरोपी अवतार सिंह, कृष्णलाल, जसबीर सिंह आणि सबदिल सिंह यांनाही न्यायालायने शिक्षेतून मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, एका आरोपीचा कोर्ट ट्रायल सुरु असतानाच मृत्यू झाला आहे. बलात्कार आणि पत्रकार हत्या प्रकरणात राम रहिमचे अपली उच्च न्यायलयात अद्याप प्रलंबित आहे. सध्या राम रहिम रोहतक येथील तुरुंगात आहे.

2002 सालचं हत्याप्रकरण

सन 2002 साली डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्य असलेल्या रंजीत सिंहची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रणजीत सिंहने साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात निनावे चिठ्ठी आपल्या बहिणीकडून लिहून घेतली होती. यासंदर्भाने पोलीस तपासावर नाराज असलेल्या रंजीत सिंहच्या मुलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशाने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. सीबीआय तपासात राम रहिमसह 5 आरोपींना दोषी ठरवून सीबीआय न्यायालायने शिक्षा सुनावली होती. सन 2007 मध्ये कोर्टाने आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले होते.

बलात्कार प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा

दरम्यान, सध्या आरोपी गुरमीत राम रहीम हा दोन शिष्यांवरील बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळल्याने तुरुंगात 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. तर, 2021 मध्ये रंजीतसिंह हत्या प्रकरणात कट रचण्याच्या आरोपाखाली न्यायालायने राम रहीमसह इतर चौघांना दोषी ठरवले होते. मात्र, याप्रकरणात पंजाब व हरयाणा उच्च न्यायालायने चारही जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

राम रहिमचा भक्त होता रणजीत सिंह

रणजीत सिंह हा हत्या प्रकरण सीबीआयच्या स्पेशल कोर्टामध्ये सुरू आहे. रणजीत सिंह राम रहिमच्या डेऱ्याचा मॅनेजर आणि भक्त होता. 10 जुलै 2002 मध्ये त्याची गोळी मारून हत्या करण्यात आली. या प्रकरणात राम रहिमसोबत कृष्ण लाल देखील अडकला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow