हरवलेला संदीप पंधरा दिवसांनी नातेवाईकांना मिळाला

Jun 29, 2024 - 09:44
 0
हरवलेला संदीप पंधरा दिवसांनी नातेवाईकांना मिळाला

◼️ माहेर संस्था व  रत्नागिरी शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

रत्नागिरी : पाच दिवसांपूर्वी माहेर निराधार पुरुषांच्या आश्रम खेडशी या ठिकाणी शहर पोलिसांमार्फत भाटे या गावांमध्ये निराधार भटकणाऱ्या व्यक्तीस दाखल करण्यात आले होते. माहेर संस्थेत दाखल झाल्यावर त्या व्यक्तीची चौकशी केली असता, त्याचे नाव संदीप शिंदे, शिंदेवाडी, शाहुवाडी कोल्हापूर असे त्यांनी सांगितले. तो धागा पकडत माहेर संस्थेचे कार्यकर्ते यांनी शहर पोलिसांच्या मदतीने संदीपच्या नातेवाईकांचा शोध लावला. 

संदीप चे भाऊ शिवाजी शिंदे हे माहेर संस्थेत येऊन संदीपला त्यांनी सुखरूप ताब्यात घेतले. शिवाजी शिंदे यांनी सांगितले की संदीप हा मनोरुग्ण आहे. त्याच्या उपचारासाठी आम्ही शासकीय मनोरुग्णालयात पंधरा दिवसापूर्वी आलो होतो.आम्ही औषधे घेत असताना आमची नजर चुकवून संदीप बेपत्ता झाला होता. त्याचा आम्ही सर्वत्र शोध घेतला. परंतु तो कोठेच आढळून आला नव्हता. माहेर संस्था व शहर पोलीस रत्नागिरी यांच्या मदतीने आमचा हरवलेला भाऊ सापडल्याचा आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. 

हरवलेल्या व्यक्तीला नातेवाईक सापडल्याने माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख,सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे, माहेर संध्याहोम निराधार पुरुषांचे आश्रम खेडशी येथील इन्चार्ज प्रदीप सैंदाणे व सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 29-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow