Ratnagiri : भात लावण्यांना प्रारंभ
![Ratnagiri : भात लावण्यांना प्रारंभ](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202406/image_870x_667eac60ce440.jpg)
रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भात लावण्यांना प्रारंभ झाला आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर काहीसा वाढल्याने पाणी साचलेल्या शेतातून लावण्यांना प्रारंभ झाला आहे.
मंगळवारपासून पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून भात खाचरांमधून पाणी साचले आहे. भात पेरण्यांना आता महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे भात रोपांची वाढ पूर्ण झाली असल्यामुळे लावणीयोग्य झाली आहेत. या आठवड्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले. त्यामुळे ठिकठिकाणी लावणीस अनुकूल वातावरण निर्माण झाले होते. त्याचा फायदा उठवत शेतकऱ्यांनी लावण्यांना प्रारंभ केला आहे.
ज्या शेतांमधून पाणी साचले आहे, अशा शेतांमधून शेतकऱ्यांनी लावणीला प्रारंभ केला आहे. ठिकठिकाणी भात खाचरांमधून जोते फिरताना आणि महिला लावणी करताना दिसत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:57 28-06-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)