खेड : मुलांना शिरवली शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय

Jun 29, 2024 - 11:11
Jun 29, 2024 - 11:15
 0
खेड : मुलांना शिरवली शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय

खेड : खेड तालुक्यातील शिरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत सोमवारी (ता. २४) कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करून पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला.

तिसऱ्या दिवशीही शाळेत मुलांचा किलबिलाट ऐकू आला नाही. या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग असून २८ पटसंख्या आहे. सोमवारी सुदैवाने शाळा सुटल्यानंतर शाळेचे छप्पराचा भाग कोसळल्याने दुर्घटना टळली आहे. मात्र छत कोसळण्यास शिक्षण विभागाचा निष्काळजीपणाच कारणीभूत ठरल्याचा आरोप करत पालक च ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण यांना जाब विचारला. जोपर्यंत शाळेची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतल्याने शिक्षण विभागाची कोंडी झाली आहे.

दरम्यान उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय कदम यांनी शुक्रवारी शिरवली येथे दुर्घटनाग्रस्त शाळेची पाहणी करून ग्रामस्थ व पालक यांच्याशी चर्चा केली शाळेलगत असलेल्या उर्वरित दोन वर्ग खोल्या सुस्थितीत असल्यामुळे या इमारतीत शाळा सुरु करण्याबाबत पालकांची समजूत काढली. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला संजय कदम यांनी लवकरात लवकर शाळेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्याच्या सूचना दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow