रत्नागिरीतील 'सेतू' शोधताना अडचणी..

Jun 29, 2024 - 11:08
 0
रत्नागिरीतील 'सेतू' शोधताना अडचणी..

रत्नागिरी : शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेल्या विविध दाखले आणि प्रमाणपत्रासाठी येथील सेतू कार्यालयात विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची गर्दी होऊ लागली आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयाचे नव्या जागेत स्थलांतर झाल्याने अधिकच पालकांची गैरसोय होऊ लागली आहे.

सध्या अनेक दाखले ऑनलाईन झाले असले, तरी ग्रामीण भागातील जनतेला ते दाखले काढण्यात अनेक अडचणी येत असल्याने दाखल्यांसाठी ग्रामीण भागातून अनेक पालक येथील सेतू कार्यालयात येत आहेत. शैक्षणिक विविध कारणांसाठी आवश्यक असलेले दाखले मिळताना काही वेळा विलंब होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तसेच प्रांत कार्यालयाकडे जाणारे प्रवेशद्वार या परिसरात खोदकाम सुरू असल्याने बंद ठेवण्यात आले आहे. पर्याय मार्ग ठेवण्यात आला आहे. या मार्गाने आल्यानंतर नागरिकांना कार्यालये शोधावी लागतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 29-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow