मिऱ्या-नागपूर महामार्गावर करंजारीत उभारणार टोलनाका; ८७ बसथांबे; शहरी भागासह ३२ ठिकाणी हायमास्ट बसवणार

Jun 29, 2024 - 11:34
Jun 29, 2024 - 11:42
 0
मिऱ्या-नागपूर महामार्गावर करंजारीत उभारणार टोलनाका; ८७ बसथांबे; शहरी भागासह ३२ ठिकाणी हायमास्ट बसवणार

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गातील चौपदरीकरणाच्या अनेक महत्त्वाच्या बाबी पुढे येऊ लागल्या आहेत, या महामार्गावर एका ढाच्यातील एकूण ८७ बसथांबे उभारले जाणार आहेत. महामार्गावर शहरी भागासह अन्य ३२ ठिकाणी हायमास्ट बसवण्यात येणार आहेत. विविध ठिकाणी ६१ जंक्शन होणार आहेत. विशेष म्हणजे या महामार्गावर साखरपा- करंजारी येथे टोलनाका उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मिऱ्या-नागपूरच्या प्रवासासाठी वाहनधारकांना पैसे मोजावे लागणार आहेत. मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा मिऱ्या ते दख्खन हा टप्पा येतो. विशेष म्हणजे सुमारे साडेनऊशे कोटीच्या या प्रकल्पाची मुदत २ वर्षांची आहे; परंतु ठेकेदार कंपनीने वेगवान विकासकाम करून ५४ टक्के चौपदरीकरण पूर्ण केले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली तेरा वर्षे झाले तरी अजून संपलेले नाही. त्या तुलनेत मिऱ्या-नागपूरचे काम वेगाने सुरू आहे; परंतु हे काम करत असताना अनेक अडचणी आल्या. साखरपा, नाणीज, पाली भागात ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी होत्या. त्या तत्काळ दूर करण्याचे आदेश महामार्ग प्रकल्प अधिकारी वसंत पंदेरकर यांनी दिले, त्याची कार्यवाही सुरू झाली असून, अनेक समस्यांवर तोडगा करण्याचे काम सुरू आहे. महामार्गाच्या कामामध्ये अनेक सुविधांचा समावेश आहे. मार्गावर एकूण ८० बसथांबे आहेत. एकाच ढाच्याचे हे थांबे असणार आहेत. 

महामार्ग म्हटल्यावर टोल आला, परंतु रत्नागिरीत हा टोलनाका नसेल, अशी सर्वांची धारणा होती; परंतु रत्नागिरीकरांनाही मिऱ्या -नागपूर महामार्गावरून जाताना पैसे मोजावे लागणार आहेत. कारण, महामार्गावर साखरपा करंजारी येथे टोलनाका उभारण्यात येणार आहे. महामार्गावर शहरी भागासह ३२ ठिकाणी हायमास्ट बसवण्यात येणार आहेत. साखरपा-दाभोळे येथे १.६ किमी बायपास तयार केला जाणार आहे.

७ हजार वृक्षांची लागवड
रत्नागिरी टप्प्यातील महामार्गावर सात हजार वृक्षांची लागवड होणार आहे. विविध ठिकाणी ६१ जंक्शन विकसित केली जाणार आहेत. महामार्गावरील मध्ये असलेल्या ५ मीटरच्या दुभाजकात शोभिवंत झाडे लावण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow