अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मुंबईत १ जुलैला आंदोलन

Jun 28, 2024 - 13:53
 0
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मुंबईत १ जुलैला आंदोलन

गुहागर : मागील दोन अधिवेशनांत सरकारने मानधनवाढ, पेन्शन, ग्रॅच्युईटी, आहारदरात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यातील एकाही आश्वासनाची पूर्तता सरकारने केलेली नाही. त्यामुळे १ जुलैला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.

अंगणवाडी सेवकांनी ५३ दिवसांचा संप केला होता. त्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी आरोग्यसेविका, आशा कर्मचारी यांची मानधन वाढ करण्याचा प्रस्ताव सभागृहात आणला. त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधनवाढ करण्याचा प्रस्ताव आणून मान्य करून घेणार, असे लेखी आश्वासन देऊनही काहीच झाले नाही. पेन्शन, ग्रॅच्युईटीबद्दलचे प्रस्ताव आचारसंहितेनंतर अडकवले गेले. या सर्वांबद्दल अंगणवाडी कर्मचारी यांच्या मनात प्रचंड चीड आहे. याचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे १ जुलैला ११ वा. छत्री घेऊन आझाद मैदानावर मोठ्या संख्येने जमावे, असे आवाहन कृती समितीतर्फे कमल परुळेकर, शालिनी तारकर, रोहिणी लाड, संज्योक्ती शिंदे, किशोरी पारकर आणि सारिका हळदणकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow