खेड : भोस्ते येथे गांजा जप्त

Jun 29, 2024 - 11:44
Jun 29, 2024 - 11:52
 0
खेड : भोस्ते येथे गांजा जप्त

खेड : तालुक्यातील भोस्ते जस्नाईक मोहल्ला येथील जस्नाईक चाळीत एका खोलीत टाकण्यात आलेल्या धाडीत ६ हजार ३४ रुपयांचा ४०३ ग्रॅम गांजा जप्त करून एकास ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. फैयाज रहीम कोंडविलकर असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडे ६ हजार ३४ रुपयांचा गांजा आढळून आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow