गुहागर बसस्थानक झाले खड्डेमुक्त

Jun 29, 2024 - 11:22
Jun 29, 2024 - 14:25
 0
गुहागर बसस्थानक झाले खड्डेमुक्त

गुहागर : गुहागर बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मचे कॉक्रिटीकरण सुरू झाले आहे. विस्तारित सुसज्ज अशा कामाचा दर्जाही चांगला राखण्यात आला असून, संपूर्ण बसस्थानक परिसर खड्डेमुक्त झाला आहे. या कामाबद्दल बसचालकांसह प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. गुहागर बसस्थानकात बस लावण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे; मात्र, तेथील परिसर चांगला दिसत नव्हता.

दरवर्षी बसस्थानकात खड्डे पडायचे. खडबडीत रस्त्यांमुळे बसचालकांनाही बस लावताना मोठी कसरत करावी लागत होती. खड्यात बस आपटणे, पावसाळ्यात खड्डामध्ये पाणी साचून ते बस लावत असताना प्रवाशांच्या अंगावर उडणे, असे प्रकार घडत होते. एमआयडीसीच्या माध्यमातून गुहागर बसस्थानकातील प्लॅटफॉर्मच्या कॉक्रिटीकरणासाठी निधी मंजूर झाला. हे काम काही दिवसांपूर्वी बुल्ड एक्स्पर्ट कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून सुरू झाले आहे.

चिपळूण शिवाजीनगर बसस्थानकाचे काम वेळेत पूर्ण करून गुहागर बसस्थानकाचे काम प्रगतिपथावर असून लवकरच पूर्ण होईल असा विश्वास कंपनीच्या ठेकेदारांनी व्यक्त केला. या कामाच्या भूमिपुजनावेळी आशिष मोहरेकर, प्रथमेश रहाटे तेजस शिंदे, ऋतुराज रहाटे उपस्थित होते. प्रथमच अशा पद्धतीचे दर्जेदार काम सुरू असल्याने प्लॉटफॉर्मला बस लावणे अधिक सुलभ होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow