टी20 विश्वचषकातील टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक..

May 28, 2024 - 15:40
 0
टी20 विश्वचषकातील टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक..

दोन महिन्यानंतर आयपीएलचा महासंग्राम संपलाय. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये रविवारी महाअंतिम सामना पार पडला.

कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादचा दारुण पराभव करत चषकावर नाव कोरलेय. आयपीएल संपल्यानंतर आता क्रीडा चाहत्यांच्या नजरा टी20 विश्वचषकाकडे लागल्या आहेत. दोन जून पासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. आठवडाभरात विश्वचषकाचा माहोल तयार होईल. भारतीय संघाची पहिली बॅच अमेरिकेत दाखल झाली आहे. उर्वरित खेळाडू चार दिवसांमध्ये रवाना होणार आहेत.

यंदाचा टी20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. विश्वचषकात यंदा 20 संघ सहभागी होणार आहेत. दोन जूनपासून विश्वचषकाचा महासंग्राम सुरु होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया ग्रुप अ मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारताशिवाय अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. भारतीय संघाचे साखळी फेरीतील सर्व सामने अमेरिकामध्येच होणार आहेत.

भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना 5 जून, बुधवारी आयर्लंडविरोधात होणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. या सामन्याकडे क्रीडा विश्वाच्या नजरा लागल्या आहेत. हे दोन्ही सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत.

30 एप्रिल 2024 रोजी बीसीसीआयने टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यांची घोषणा केली होती. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे, तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवम्यात आलेय. भारतीय संघात 15 प्रमुख खेळाडूंशिवाय चार राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात आलेली आहे.

टी20 विश्वचषकातील टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

पहिला सामना 05 जून, बुधवार- भारत विरुद्ध आयरलँड- नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क

दूसरा सामना 09 जून, रविवार- भारत विरुद्ध पाकिस्तान- नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क

तिसरा सामना 12 जून बुधवार- भारत विरुद्ध अमेरिका, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क

चौथा सामना 15 जून, शनिवार- भारत विरुद्ध कॅनाडा, सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा.

टी20 विश्वचषकासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू- शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow