IPL Final 2024 : SRH वर दणदणीत विजय मिळवत KKR ने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर कोरले नाव..

May 27, 2024 - 12:03
 0
IPL Final 2024 : SRH वर दणदणीत विजय मिळवत KKR ने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर कोरले नाव..

आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात दिमाखदार विजय मिळवत कोलकाता नाईट रायडर्सने दिमाखदार विजय मिळवला. केकेआरने हा विजय मिळवत आयपीएलमधील 10 वर्षांचा दुष्काळ संपवलाय. केकेआरने 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात आयपीएलचा हंगाम जिंकला होता.

त्यानंतर 10 वर्षांनी केकेआरला आयपीएलच्या चषकावर नाव कोरण्यात यश आलं आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात केकेआरकडून कोणी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली? केकेआरच्या विजयाचे शिल्पकार कोण ठरले ? जाणून घेऊयात...

सुनील नारायणची अष्टपैलू कामगिरी

केकेआरकडून संपूर्ण हंगामात सुनील नारायणने अष्टपैलू कामगिरी केली. आयपीएलच्या चषकावर नारायणचा सिंहांचा वाटा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याने 14 सामन्यात 180 च्या स्ट्राईक रेटने 488 धावा कुटल्या. यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. फलंदाजी बरोबरच नारायणने गोलंदाजीमध्येही आपली चमक दाखवली. त्याने 14 सामन्यात 17 विकेट्स पटकावल्या आहेत.

आंद्रे रसेलही दोन्ही बाजूंनी चमकला

सुनील नारायण शिवाय आंद्रे रसेलनही फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमक दाखवली. त्याने 14 सामन्यांमध्ये 19 विकेट्स पटकावत केकेआरची गोलंदाजी भक्कम करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या सामन्यातही 3 विकेट्स पटकावत हैदराबादच्या संघाला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. गोलंदाजीशिवाय फलंदाजीतूनही रसेलने महत्वपूर्ण योगदान दिले. हार्ड हिटिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या रसेलने 222 धावा कुटल्या. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे.

वरुण चक्रवर्तीच्या फिरकीच्या जादू

वरुण चक्रवर्तीने यंदाच्या हंगामात त्याच्या फिरकीची जादू दाखवलीये. त्याने 14 सामन्यांमध्ये 21 विकेट्स पटकावल्या आहेत. केकेआरच्या संघ चालू हंगामात फिरकीमध्ये भक्कम मानला जात होता. कारण फिरकीची संपूर्ण जबाबदारी वरुण चक्रवर्तीच्या खांद्यावर होती.

सलामीवीर फिल साल्ट तुफान फटकेबाजी

केकेआरकडून यंदाच्या हंगामात सलामीवीर म्हणून फिल साल्टने तुफान फटकेबाजी केली. प्रत्येक सामन्यात सलामीवीरांनी चांगली कामगिरी करावी, अशी प्रत्येक संघाची अपेक्षा असते. फिल साल्टने प्रत्येक सामन्यातून आपली चमक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याने 12 सामन्यात तब्बल 435 धावा कुटल्या. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता.

श्रेयस अय्यरची फटकेबाजी

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने यंदाच्या हंगामात जोरदार फटकेबाजी केली. त्याने 14 सामन्यांत 351 धावा कुटल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता. त्याने या हंगामात 146.86 स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी असलेल्या श्रेयसने फलंदाजीमधून महत्वपूर्व भूमिका बजावली.

मिचेल स्टार्कचा भेदक मारा

आयपीएल 2024 लिलावामध्ये मिचेल स्टार्कवर जवळपास 25 कोटींची बोली लावली होती. सुरुवातीला स्टार्क प्रचंड महागडा ठरला होता. विकेट तर मिळत नव्हत्याच, पण गोलंदाजीही महागडी ठरत होती. त्यामुळे कोलकाता आणि स्टार्कवर टीका केली जात होती. पण स्टार्कने आपल्याला घेऊन चूक केली नसल्याचं दाखलवून दिले. मिचेल स्टार्कने फायनल आणि क्वालिफायर 1 मध्ये भेदक मारा करत कोलकात्याच्या विजायचा मार्ग सुकर केला. स्टार्कने पॉवरप्लेमध्ये भेदक मारा केला. त्याने फायनलमध्ये महत्वाच्या दोन विकेट घेतल्या. स्टार्कने यंदाच्या आयपीएल हंगामात 13 डावात 17 विकेट घेतल्या. एक वेळा 4 विकेट घेण्याचा पराक्रमही त्याने केलाय.

हर्षित राणाने 19 धावा पटकावल्या

हर्षित राणा यानं कोलकात्यासाठी भेदक मारा केला. सुरुवातीला असो अथवा डेथ ओव्हर असो... त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. फायनलमध्ये हर्षित राणा याने निर्धाव षटक टाकत हैदराबादच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. कोलकात्याकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. हर्षित राणा याने 11 डावात 19 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. 24 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली. हर्षित राणा याने 42.1 षटकं गोलंदाजी केली, यामध्ये 383 धावा खर्च केल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow