रत्नागिरी : शीळ धरणातील वाहून गेलेल्या 'त्या' पाईपचा खर्च ठेकेदारावरच

Jul 1, 2024 - 11:01
Jul 1, 2024 - 11:03
 0
रत्नागिरी : शीळ धरणातील वाहून गेलेल्या 'त्या' पाईपचा खर्च ठेकेदारावरच

रत्नागिरी : शीळ धरणावर खालच्या बाजूने टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांचे जोड निसटले. रत्नागिरी नगरपरिषदेने या धोक्यासंदर्भात ठेकेदार कंपनीला कल्पना देऊन असे नुकसान झाले तर त्याची भरपाई नगर परिषद करणार नाही, असा लेखी इशाराच दिला होता. सुमारे १५ ते २० पाईप निसटून पाण्याच्या प्रवाहात बाहेर पडल्याने ठेकेदार कंपनीचे सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शीळ धरणाच्या खालच्या बाजूने १९८ मीटरची जलवाहिनी टाकण्यासाठी ३३ पाईप मागवण्यात आले होते. हे पाईप खोदाई केलेल्या चरांमध्ये टाकण्यात आले होते. परंतु, ठेकेदार कंपनीने या जोडलेल्या पाईपवर काँक्रीट वेळेत टाकले नाही. याबाबत पाणी योजनेचे सल्लागार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि रत्नागिरी नगरपरिषदेने वेळोवेळी लेखी सूचना केल्या होत्या, असे पाणी विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी सांगितले.

पाईप टाकलेले चर काँक्रीटने भरले नसल्याने शीळ धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यावरून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात ते पाईप सुटून बाहेर पडले. या प्रकारची कोणतीही घटना घडली तर त्यासंदर्भातील कोणतीही बिले दिली जाणार नाहीत. ठेकेदार कंपनीने जुन्याच खर्चात नवीन जलवाहिन्या टाकून देणे बंधनकारक असल्याचे लेखी कळवले होते. रत्नागिरी न. प.ने आधीच इशारा दिल्याने वाहून गेलेल्या पंधरा ते वीस पाईपचा २० ते २५ लाख रुपयांचा खर्च वाचला आहे. आता ठेकेदारालाच स्वखर्चाने नवीन पाईप टाकून द्यावे लागणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow