रत्नागिरी : शहरातील धोकादायक होर्डिंग हटवण्यास सुरुवात

Jun 15, 2024 - 12:25
Jun 17, 2024 - 15:33
 0
रत्नागिरी : शहरातील धोकादायक होर्डिंग हटवण्यास सुरुवात

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील धोकादायक होर्डिंग हटवण्यास नगरपालिकेकडून सुरुवात झाली आहे.

शहरांमध्ये रस्तोरस्ती दिसणाऱ्या होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि फ्लेक्सच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाने महापालिका आणि नगर परिषदांना फैलावर घेतले असून, गेल्या सहा महिन्यांत याबाबत काय कारवाई केली आणि किती जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश राज्यभरातील पालिका-नगर परिषदांना दिले आहेत.

दरम्यान, घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनधिकृत तसेच धोकादायक होर्डिंगचा हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. 

या पार्श्वभूमीवर रनपकडून कारवाईला सुरुवात झाली असून जुना माळनाका येथील धोकादायक होर्डिंग हटविण्यास आज सुरुवात करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow