राज्यातील सरपंच विविध मागण्यांसाठी गुरुवारी मुंबईत धडकणार..

Jul 1, 2024 - 12:28
Jul 1, 2024 - 12:31
 0
राज्यातील सरपंच विविध मागण्यांसाठी गुरुवारी मुंबईत धडकणार..

संगमेश्वर : राज्यातील सरपंच आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवार (ता. ४ जुलै) रोजी मुंबईत धडकणार आहेत. मानधन वाढीबरोबर विविध मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. या आंदोलनात संगमेश्वर तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सरपंचांना दरमहा १५ हजार रुपये व उपसरपंच यांना ७ हजार रुपये मानधन देण्यात यावे महाराष्ट्रातील महसुली विभागानुसार विधान परिषदेत सरपंच आमदार प्रतिनिधी असावा. कॉम्प्युटर ऑपरेटरची नियुक्ती करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात यावेत. गावातील स्ट्रीट लाईटचे वीज बिल शासनाने भरावे, मंत्रालयीन कामकाजासाठी सरपंच यांना व्ही.आय.पी. पासची व्यवस्था करावी. सरपंच यांना मंत्रालयात प्रवेश १० ते ५ या वेळेत असावा, आजी माजी सरपंच, उपसरपंच यांचे थकीत मानधन त्वरित जमा करावे, मुंबईसह जिल्हा परिषद व पंचायत समिती या ठिकाणी सरपंच यांना कार्यालय देण्यात यावे, सरपंचावर हल्ला करणाऱ्याच्या विरोधात विशेष संरक्षण कायदा करण्यात यावा, कमी लोकसंख्येच्या गावांना वित्त आयोग निधी थेट ग्रामपंचायतीला वार्षिक रुपये १५ लाख देण्यात यावा, सरपंच व ग्रापमपंचायत यांच्या पंचायत समिती स्तरावर संयुक्त मासिक सभा महिन्यातून एकदा घेण्यात यावी, कार्यरत असलेल्या कालावधीत सरपंचांसाठी १५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे, आदी विविध मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. संगमेश्वर तालुक्यातील सरपंच या धडक मोर्चामध्ये सहभागी होणार असून, याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच प्रदीप शिंदे, शर्वरी वेल्ये, ऋतुजा कदमसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंच उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow