दापोली वासियांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

Jul 1, 2024 - 11:33
Jul 1, 2024 - 13:35
 0
दापोली वासियांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

दाभोळ : दापोली तालुक्यातील जालगाव व ब्राह्मणवाडी या गावातील विजेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, याबाबत महावितरणचे अधिकारी केवळ आश्वासन देतात; मात्र कृती करत नाहीत. या भूमिकेतून जालगावचे उपसरपंच राजेंद्र चव्हाण व तंटामुक्त गावममितीचे अध्यक्ष बापू लिंगावळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी दापोली येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. एका महिन्यात जालगावच्या समस्या सुटतील, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. दापोली शहरानजीक जालगाव व ब्राह्मणवाडी ही दोन महसुली गावे असून, सुमारे २५ वाडयांचा यामध्ये समावेश आहे. दापोली शहराइतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त अशी लोकसंख्या या परिसरात आहे, मात्र महावितरणच्या अर्बन भागात मोडूनही या भागाला आवश्यक त्या सोयीसुविधा नाहीत. गावामध्ये असलेले एक वायरमन वगळता अन्य सर्वजण विद्युतखांबावर चढण्यास कार्यक्षम नाहीत. त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरवर अधिक लोड आलेला असतानाही जास्त क्षमतेचे ट्रान्स्फॉमर या गावामध्ये बसवण्यात आलेले नाहीत. त्याचप्रमाणे विद्युततारा या खाली आल्या असून, त्यांना आवश्यक ते सुरक्षागार्ड बसवण्यात आलेले नाहीत. कर्मचारी हे ग्रामस्थांनाची दिशाभूल करणारी माहिती देत असत वारंवार वीजपुरवठा महावितरण अधिकाऱ्यांनी कर्यालयात ठिय्या मांडून बसलेल्या ग्रामस्थांना भूमिकेवर ठाम राहिल्याने अधिकारही जमिनीवर बसले.

यावेळी दीने काळकाईकोंड ते ब्राह्मणवाडी अशी स्वतंत्र लाईन टाकून जालगांवमधील काही भागाचा विद्युत खंडित होण्याचा प्रश्न सोडवण्याचे मान्य करण्यात आला. तसेच जालगांवकडे जाणारी विद्युतवाहिनी हि वनौशी इथपर्यंत जात असल्याने  सुधारण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. त्या भागात काही समस्या निर्माण झाल्यास त्याचा परिणाम जालगावला भोगावा लागत असल्याचे सांगत तीन टप्प्यांत हि विद्युतवाहिनी सुधाराण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे वळणे येथे स्वतंत्र सबस्टेशन मंजूर झाले असून, त्या कामाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. जालगाव ग्रामपंचायत येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात येईल, तसेच ग्राहकांजवळ सौजन्याने वागण्यासाठी सूचना देण्यात येतील, जालगांवचा विजेचा प्रश्न महिन्यात मार्गी लावता जाईल, असे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow