संगमेश्वर तालुक्यात वर्षभरात ६६० कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया

May 28, 2024 - 17:23
May 29, 2024 - 11:34
 0
संगमेश्वर तालुक्यात वर्षभरात ६६० कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया

देवरुख : कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व छोटे कुटुंब सुखी कुटुंब या शासनाच्या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संगमेश्वर तालुक्यात गतवर्षीच्या आर्थिक वर्षात तालुक्यात ६६० शस्त्रक्रिया पार पडल्या. यात तब्बल ८० पुरुष शस्त्रक्रीयांचा समावेश आहे.

लोकसंख्येला आळा बसावा, यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले. यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ही योजना सुरु केली. याचा प्रचार व प्रसार शासकीय कर्मचारी व आरोग्य विभाग यांच्यामार्फत केला व आजही केला जात आहे.

याला सध्या आरोग्य विभागाला आशा वर्कस व एकात्मिक बालविकास विभागामधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा प्रतिसाद मिळत आहे. या सेविका व आशा घरोघरी जावून जनजागृती करतात. याला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो. कुटुंबाचा वाढता गाडा थांबवण्यासाठी नागरिक कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया या उपायाकडे वळू लागले आहेत. यामुळेच या उपक्रमाला प्रतिसाद मिळताना दिसून येतो. या शस्त्रक्रिया वाढाव्यात यासाठी शासकीय कर्मचारी वर्ग यांना बढती साठी उद्दिष्ट दिले जाते.

लाभार्थी यांना शस्त्रक्रियेप्रसंगी सहकार्य आशा व सेविका यांचे लाभते, शस्त्रक्रियेतही दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया याला महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. शस्त्रक्रयेप्रसंगी लाभार्थी यांची काळजी शासन घेत असल्याने लाभार्थी यांच्या मनातील शस्त्रक्रिया भीती दूर होत आहे. तालुक्यात गतवर्षी २०२३-२४ मध्ये ६६० शस्त्रक्रीया पार पडल्या. तालुक्यातील सर्वाधिक या  शस्त्रक्रिया माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात ७९ झाल्या. यात ९ पुरुष शस्त्रक्रियांचा समावेश आहे. वांद्री केंद्रात ७ पुरुष ५० महिला शस्त्रक्रीया समावेश आहे. कोंड उमरेत व फुणगूस केंद्रात प्रत्येकी ६ पुरुष व ४४ महिलांच्या शस्त्रक्रिया पार पडल्या. धामापूर ८ पुरुष व ६० महिलांचा समावेश आहे. बुरंबी ७ पुरुष व ५० महिलांनी शस्त्रक्रीया करुन घेतल्या. साखरपा ९ पुरुष ५४ महिला, सायले ८ पुरुष ५४ महिला. देवळे ६ पुरुष व ४८ महिला. कडवई ७ पुरुष व ५६ महिला.

निवे खुर्द येथे ७ पुरुष व ५० महिलांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातून लाभार्थी पर्तच पोहोचण्याचे काम केल्याने या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या या शस्त्रक्रिया साखरपा, सायले व देवळे प्राथमिक आरोग्यकेंद्रात केल्या जातात. लवकरच देवरुख ग्रामीण रुग्णालय पार पाडाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम सुरु असल्याने शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:49 PM 28/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow