चिपळुणात शहरांतर्गत एसटी वाहतूक सुरू

Jun 25, 2024 - 10:48
 0
चिपळुणात शहरांतर्गत एसटी वाहतूक सुरू

चिपळूण : राज्य परिवहन विभागाच्या चिपळूण आगारातून शहरांतर्गत एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. चिपळूण आगाराने चार दिवसांपूर्वी चिपळूण बस स्थानक ते गोवळकोट धक्कापर्यंत एसटीची फेरी सुरू केली आहे.

पहाटे पाच वाजेपासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत एकूण १६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चिपळूण ते गोवळकोटपर्यंत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा परिवहन विभागाने उपलब्ध केली आहे. महिलांना या एसटीतून सवलतीच्या दरात केवळ दहा रुपयात प्रवास करता येणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना या एसटीतून मोफत प्रवास करता येणार आहे. विद्यार्थ्यांना दहा दिवसाचे भाडे भरून वीस दिवस प्रवास करता येणार आहे.

शिवाजीनगर बस स्थानकातून सुटणाऱ्या फेऱ्या डीबीजे कॉलेज, विंध्यवासिनी फाटा, बहादूरशेख नाका, काविळतळी, चिपळूण बाजार, मार्कंडी, युनायटेड इंग्लिश स्कूल, चिंचनाका, जुना स्टॅन्ड, उक्ताडमार्ग गोवळकोट धक्क्यावर जातील. गोवळकोट धक्का येथून सुटणाऱ्या फेऱ्या उक्ताडमार्गे मच्छीमार्केट, भाजी मंडई, जुना बस स्टॅण्ड, एसबीआय बँक चिंचनाका, घाणेकर हॉस्पिटल, युनायटेड इंग्लिश स्कूल, देवधर हॉस्पिटल मार्कंडी, काविळतळी, बहाद्दूरशेख नाका, विंध्यवासिनी फाटा, डीबीजे कॉलेज, पावर हाऊस ते बस स्थानकापर्यंत धावणार आहेत.

चिपळूण आगाराने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बस स्थानक ते गोवळकोट धक्कापर्यंत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महिला आणि विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 25-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow