खेडमध्ये खांबतळ्यानजीक हाणामारी; तिघेजण जखमी

Jul 1, 2024 - 11:43
Jul 1, 2024 - 14:44
 0
खेडमध्ये खांबतळ्यानजीक हाणामारी; तिघेजण जखमी

खेड : शहरातील खांबतळे शेजारी एका घरात शुक्रवारी दि. २८ रोजी रात्री १० वा. च्या सुमारास किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दि. २९ रोजी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.

खेड शहरातील खांबतळे परिसरात एका घरात शेख कुटुंब वास्तव्यास असून, दि. २८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास नसीमा शकील शेख (वय २७, व्यवसाय-मजुरी, रा. खेड खांबतळे तीनबत्ती नाका) तिचा पुतण्या अलताफ मजीद शेख हा दारूच्या नशेमध्ये बडबड करीत असल्याने, तिने त्याला तुझे जेवण झाले आहे; तू तुझ्या खोलीत जाऊन झोप, असे सांगितले. त्याचा राग मनात धरून अलताफ याने तिला तसेच तिच्या पतीला शिवीगाळ करून हाताचे थापटाने मारहाण करून धक्काबुक्की केली. त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी तिचा मुलगा साहील शकील शेख हा आला असता, अलताफ याने घरातील तवा उचलून साहील याच्या डोक्यात पाठीमागून मारला. यावेळी त्यांचा दुसरा पुतण्या नदिम मजीद शेख यानेदेखील घरातील काठीने नसीमा यांना पायावर तसेच तिचे पती शकील याला उजव्या खांद्यावर व मुलगा साहील याचे पाठीवर मारहाण केली. या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी झाले. 

नफिसा हिने खेड पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी अलताफ मजीद शेख व नदीम मजीद शेख यांच्या विरोधात भारतीय दंड विधानातील कलम ३२४, ३२३, ५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow