१७ शहरांत महिलांना ई-पिंक रिक्षांचे वाटप करणार

Jul 1, 2024 - 12:39
Jul 1, 2024 - 14:41
 0
१७ शहरांत महिलांना ई-पिंक रिक्षांचे वाटप करणार

पुणे : "पुण्यासह १७ शहरांत पहिल्या टप्प्यात महिलांना १९ हजार ई- पिंक रिक्षा देण्यात येणार असून एकट्या पुणे शहरात एक हजार रिक्षा देण्यात येणार आहेत. पुढील काळात ओला, उबेरसारख्या व्यासपीठाशी या रिक्षांच्या जोडणीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महिलांनी प्रवासासाठी नोंदणी केल्यास त्यांना महिला चालक असलेल्या ई पिंक रिक्षातून प्रवास करता येणार आहे," अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. भवानी पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर येथे राज्य महिला आयोगामार्फत पुणे महापालिकेच्या साहाय्याने आयोजित कार्यक्रमात तटकरे यांनी ही माहिती दिली. 

यावेळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, सचिव माया पाटोळे, राजलक्ष्मी भोसले, दीपक मानकर, हेमंत रासने, लक्ष्मी आंदेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'आरोग्यवारी अभियान', महिलांसाठी तयार केलेला कक्ष तसेच संनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिनचे उद्‌घाटन तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले, वारकरी महिलांचे आरोग्य, सुरक्षितता, स्वच्छता आदर्दीच्या अनुषंगाने हा उपक्रम चांगला असल्याचे सांगून तटकरे म्हणाल्या, "वारीमध्ये वृद्ध, मुली, गरोदर स्त्रिया तसेच स्तनदा माता अशा सर्व स्तरात्तील महिला अनेक दिवसांसाठी घरापासून दूर असतात. अशा वेळी सॅनिटरी नॅपकिन वाटपासारखा कौतुकास्पद उपक्रम राबविताना त्यांची धार्मिक, आध्यात्मिक परंपरा जपण्यासह आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोगाने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. या वारीदरम्यान आयोगाकडून २५० पेक्षा जास्त आरोग्य केंद्रे वारकरी महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत."

मोहोळ म्हणाले, "वारीमध्ये महिला प्रवास करत असताना आरोग्याच्या ( अनेक समस्या होत असतात. अशा प्रसंगी त्यांची काळजी घेणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी स्थानिक प्रशासनाच्या साहाय्याने आयोगामार्फत गेल्या तीन वर्षांपासून  हा उपक्रम राबविण्यात येत आहे, हे  कौतुकास्पद आहे."

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow