दोन वर्षात महाराष्ट्र एफडीआयमध्ये अव्वल स्थानी : उद्योगमंत्री उदय सामंत

Jul 2, 2024 - 12:14
 0
दोन वर्षात महाराष्ट्र एफडीआयमध्ये अव्वल स्थानी : उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : तीन वर्षापूर्वी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. ती पूर्वपदावर आणण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी केली.

दोन वर्षात महाराष्ट्र एफडीआयमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. खोट्या नरेटिव्हने उद्योग खात्यावर टीका करताना भान बाळगावे, असे शिवसेना उपनेते, प्रवक्ते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना खडसावले.

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वर्ष 2022-23 मध्ये राज्याचा जीडीपी 9.4% इतका वाढला. गुजरातचा केवळ 8% इतका होता. एफडीआयचा आलेख बघितला तर मागील सलग दोन वर्ष महाराष्ट्र एफडीआयमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. एफडीआयमध्ये महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकाला मागे टाकले आणि अव्वल राज्य बनले. 2022-23 मध्ये 1,18,422 कोटी आणि 2023-24 मध्ये 1, 12,000 कोटी एफडीआय आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न 14.95% नी वाढले आहे. महाराष्ट्र देशातील स्टार्टअप्स बनले आहे. राज्यात नोंदणीकृत स्टार्टअप्सची संख्या एकूण 21,105 नोंदणीकृत स्टार्टअप्स असून त्यातून 2,37,171 रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एमआयडीसीबाबत लक्षवेधी विचारण्यात आली होती. ज्याप्रकारे विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीत मुसलमानांबाबत, संविधानाबाबत फेक नरेटिव्ह पसरवण्यात आला होता तसाच हा प्रश्न होता. जिथे एमआयडीसी नाही तिथून गुजरातला प्रकल्प गेले, असा खोटा दावा करण्यात आला. यामुळे तीन वर्षात डावोसला झालेल्या गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रात किती एफडीआय, किती करार झाले आणि किती अंमलबजावणी झाली त्याची सरकारकडून श्वेतपत्रिका काढण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. उद्योग खात्यावर खोट्या नरेटिव्हने टीका केल्यानं गुंतवणूकदार, उद्योजकांमध्ये एक अडथळा निर्माण होतो. त्याचा परिणाम राज्यावर होतो. उद्योग विभागावर टीका करताना विरोधकांनी भान ठेवायला हवे असे डॉ. उदय सामंत यांनी विरोधकांना खडसावले.

अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेचा मंत्री उदय सामंत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की,वारकरी दिंड्यांना सरकारने 20 हजारांचे अनुदान दिले मात्र काहीजणांना पोटदुखी झाली. या घोषणेला विरोध करताना वारकरी संप्रदायाचा अपमान केला. वारकरी भवन बांधण्याची भीष्म प्रतिज्ञा मविआ सरकारमध्ये काहीजणांनी केली होती. त्याचे काय झाले हा प्रश्न वारकऱ्यांनी विचारला पाहिजे.

रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार रिफायनरीला समर्थन करता आणि माजी खासदार विरोध करतात. यावर उबाठा गटाने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अशाच प्रकारे वाढवण बंदराला विरोध केला जात आहे. प्रकल्प आला की विरोध करायचा आणि तो पूर्ण झाला की माझ्यामुळे झाला असा आव आणायचा हे फारकाळ टीकणार नाही, अशी टीका उदय सामंत यांनी केली.

लोकसभेच्या जागा जास्त मिळाल्या त्यांना आवाहन आहे की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुस्लिम मते मिळाली हे सांगावे आणि दलित बांधवांमध्ये संविधान बदलणार असे खोटे नरेटिव्ह पसरवून मते मिळवली असे जाहीर करावे, असे सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 02-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow