खानू, नाणीज येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा साजरा

Jul 2, 2024 - 11:22
Jul 2, 2024 - 15:29
 0
खानू, नाणीज येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा साजरा

पावस : रत्नागिरी तालुक्यातील खानू व नाणीज येथे कृषी संजीवनी पंधरवड्यानिमित्त भातलावणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. कृषी विभागामार्फत जिल्ह्यात १७ जून ते एक जुलै या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध उपक्रम राबवत आहेत.

खानू येथील कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी विनायक अवेरे म्हणाले, या कार्यक्रमात प्रत्येक दिवशी निरनिराळे कार्यक्रम तथा योजनांची प्रचार प्रसिद्धी प्रात्यक्षिके, पिकविमा जनजागृती, पीएम किसान उत्सव दिवस, महिला शेतकरी सन्मान दिवस, शेतकरी मासिक वाचन, कीडरोग सर्वेक्षण व उपाययोजना आदी उपक्रमांचा समावेश आहे. याचे औचित्य साधून कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रमानिमित्त २८ व २९ जूनला रत्नागिरी तालुक्यातील खानू व नाणीज येथे चारसुत्री भातलावणी प्रात्यक्षिक घेण्यात आले तसेच पिकविमा योजनेची प्रचारप्रसिद्धी करण्यात आली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित कृषी पर्यवेक्षक राहुल पाटील, कृषी सहाय्यक सागर सांगवे, सचिन पवार उपस्थित होते. उपस्थितांना कृषी विभागाच्या योजना, मग्रारोहयो योजनेतर्गत फळबाग लागवडीवर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी माधुरी कांबळे, गुंडू पाटील, खानू आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:51 PM 02/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow