आर्जू कंपनीच्या आणखी एका संचालकाला अटक

May 29, 2024 - 09:39
May 29, 2024 - 09:42
 0
आर्जू कंपनीच्या आणखी एका संचालकाला अटक

रत्नागिरी : आर्जु टेक्सोल कंपनीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत दोन संचालकांना अटक केली आहे. यामध्ये संजय गोविंद केळकर (४९, रा. घर नं. ३५०, अथर्व हॉटेलशेजारी, तारवेवाडी- हातखंबा, रत्नागिरी) याला यापूर्वीच २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्याला ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्या आली आहे, तर मंगळवारी प्रसाद शशिकांत फडके, (वय ३४, रा. ब्राह्मणवाडी, रामेश्वर मंदिराजवळ गावखडी, रत्नागिरी) याला संगमेश्वर येथून अटक करण्यात आली. 

प्रसाद हा दिल्ली येथून हरिव्दार, हैदराबाद असा प्रवास करीत रत्नागिरीत येत असताना त्याला संगमेश्वमध्ये पोलिसांनी अटक केली. त्याला ही ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

या फसवणुकीच्या प्रकरणात २३ मे रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे भा.दं. वि. सं. चे कलम ४२० वगैरे अन्वये आर्जु टेक्सोल कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन अधिक तपास रत्नागिरी पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा (इकोनॉमिक ऑफेन्स विंग) ह्यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणामधील अन्य दोन संशयित आरोपी नजरेआड आहेत. या प्रकरणात आजवर बळी पडलेल्या ११५ लोकांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. 

दरम्यान, फसणुकीसंर्भात तक्रार नोंदवू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कार्यालयात भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित कंपनीत गुंतवणुकीचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि फसवणूक करणाऱ्या कंपनीकडून मिळालेला कोणताही पत्रव्यवहार यासह सर्व संबंधित कागदपत्रे सोबत आणावेत. जबाब नोदंविण्याकरिता ज्या नागरिकांनी संबंधित कंपनीत गुंतवणूक केली आहे आणि ज्यांच्या तक्रारी नोंदवण्याची इच्छा आहे, अशा नागरिकांशी जबाव नोंदविण्याकरीता भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी नागरिकांना टप्या-टप्याने संपर्क करून बोलावण्यात येईल. सर्व नागरिकांनी शांतता व संयम राखावा तसेच कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ज्यांची आरजू टेक्सोल कंपनीने, व्यक्तींकडून फसवणूक झाली आहे, त्या सर्वांच्या साक्षी नोंदविण्यात येतील. पोलिस दल प्रत्येक तक्रारीची काळजीपूर्वक हाताळणी करण्यासाठी कटिबद्ध आहे. – धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 29-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow