"सर्वांत आधी रोहितकडे पाहिले, मी त्याच्याकडेच चेंडू फेकणार होतो, पण..."; सूर्याचं 'त्या' झेलवर भाष्य

Jul 3, 2024 - 12:10
Jul 3, 2024 - 12:18
 0
"सर्वांत आधी रोहितकडे पाहिले, मी त्याच्याकडेच चेंडू फेकणार होतो, पण..."; सूर्याचं 'त्या' झेलवर भाष्य

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav)सीमारेषेवर डेव्हिड मिलरची अप्रतिम कॅच पकडली आणि तिथेच सामना भारताने जिंकल्यात जमा झाला. टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताचने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला.

दरम्यान, या सामन्यात सूर्यकुमार यादवने टीपलेल्या एका झेलमुळे भारताचा विजय सोपा झाला. या झेलनंतर सूर्यकुमार यादवचे कौतुक केले जात आहे. आता सूर्यकुमार यादवे या झेलवर भाष्य केलं आहे.

सोशल मीडियावर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, त्या दिवशी वेगळीच फिल्डिंग लागली होती. कारण रोहित शर्मा कधी लॉन्ग-ऑनवर उभा राहत नाही. परंतु त्यावेळी तो तिथे होता. जेव्हा चेंडू माझ्या दिशेने येत होता तेव्हा तिकडे धावताना मी सर्वांत आधी रोहितकडे पाहिले. मला चेंडू पकडायचा तर होता, परंतु रोहित जवळ असता तर त्याच्याकडेच मी तो फेकला असता. पण तो जवळ नव्हता. यानंतर डोक्यात चक्र फिरले आणि मी मैदानाबाहेर जाऊन परत झेल टिपण्याचा मार्ग निवडला, असं सूर्यकुमार यादवने सांगितले.

सूर्यकुमार यादवने झेल घेत सामन्याला दिली कलाटणी

बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकण्यापूर्वी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या शानदार 76 धावा आणि अक्षर पटेलच्या शानदार 47 धावांच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 176 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही.संघाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. यानंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी शानदार फलंदाजी करत टीम इंडियाकडून सामना जवळपास हिसकावून घेतला होता. हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत हेनरिक क्लासेनला झेलबाद केले. पण डेव्हिड मिलर अजूनही क्रीजवर उपस्थित होता. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. डेव्हिड मिलर स्ट्राइकवर होता. यावेळी डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. जवळपास मिलर यशस्वी देखील झाला. मात्र सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर धावत येऊन चेंडू पकडला. पण तो सीमारेषेला स्पर्श करणार होता. त्यामुळे त्याने चेंडू हवेत फेकला आणि नंतर सीमारेषेत प्रवेश केला आणि हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. जर त्याला झेल ऐवजी षटकार मिळाला असता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकू शकला असता आणि टीम इंडियाचे विजेतेपदाचे स्वप्न भंग झाले असते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow