'लायन्स क्लब रत्नागिरी'ला २० बक्षीसे

Jul 3, 2024 - 12:13
 0
'लायन्स क्लब रत्नागिरी'ला २० बक्षीसे

रत्नागिरी : कराड येथे झालेल्या सेवा सन्मान या प्रांतीय कार्यक्रमात बेस्ट प्रेसिडेंट शिल्पा पानवलकर, बेस्ट सेक्रेटरी संजय पटवर्धन, बेस्ट ट्रेझरर श्रद्धा कुळकर्णी तर सर्वोत्कृष्ट झोन चेअरमन म्हणून श्रेया केळकर यांना मानाची परमंनट ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले. शिल्पा पानवलकर यांच्या २०२३-२४ या अध्यक्षपदाच्या कालावधीतील कार्यासाठी लायन्स क्लब रत्नागिरीला एकुण ४९ बक्षीसे मिळाली.

प्रांतातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला लायन्स क्लब रत्नागिरी परंपरेला साजेसे असे काम यावर्षी झाले. यामध्ये मल्टिपलला आठ बक्षिसे, डिस्ट्रिक्ट मध्ये वीस बक्षीसे, रिजनमध्ये पाच तर झोन मध्ये चौदा बक्षीसे मिळाली.  

याबाबत माहिती देताना हे काम करताना कोणाही एकट्याचे हे काम नसून हे सर्व श्रेय टीम वर्कचे आहे, असे नम्रपणे अध्यक्ष शिल्पा पानवलकर यांनी नमुद केले. त्याचप्रमाणे सर्व लायन सदस्यांच्या सहकार्यामुळेच हे यश रत्नागिरी क्लबला मिळाले, तसेच सहसचिव म्हणून अस्लम वास्ता व सहखजिनदार मेघना शहा यांचे अनमोल सहकार्य मिळाले. वर्षभरात एकुण ६६० सेवाकार्ये करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न केला, विविध शाळांमध्ये स्पर्धा घेऊन शाळांच्या गरजा ओळखून जास्त काम केले गेले. या कामात लायन्स क्लब मधील सर्व सभासद, सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच झोन चेअरपर्सन श्रेया केळकर यांची मोलाची साथ लाभली. तसेच प्रांताचे प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर यांनीही आमच्या सेवा कार्यांना योग्य न्याय देऊन अवॉर्ड्स दिली त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow