खेड : खांबतळेत हाणामारीत तिघे जण जखमी

Jul 3, 2024 - 14:01
 0
खेड : खांबतळेत हाणामारीत तिघे जण जखमी

खेड : शहरातील खांबतळे येथे दोघांनी केलेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले. याप्रकरणी अल्ताफ मजीद शेख, नदीम मजीद शेख यांच्यावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. नसिमा शकिल शेख (२७), साहिल शकिल शेख, शकिल शेख (३५, तिथेही रा. खांबतळे-खेड) अशी तिघांची नावे आहेत. फिर्यादीच्या राहत्या घरी जेवण झाल्यानंतर पुतण्या अल्ताफ शेख हा दारूच्या नशेत घरात बडबड करत असल्याने जाऊन झोप, असे सांगितल्याचा राग मनात धरून त्याने फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या साहिल शेख व शकिल शेख यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत नसिमा शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 03/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow