गोवागड, कनकदुर्ग व फत्तेगड येथे तीन हजार सीडबॉलद्वारे बीजारोपण

Jul 3, 2024 - 11:02
Jul 3, 2024 - 14:22
 0
गोवागड, कनकदुर्ग व फत्तेगड येथे तीन हजार सीडबॉलद्वारे बीजारोपण

रत्नागिरी : छत्रपती शाहू महाराज संशोधक व मानव विकास संस्था (सारथी) तर्फे पीएचडी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभर गडकिल्ल्यांवर झाडांची संख्या वाढविण्याकरिता सीडबॉल अभियान राबविण्यात आले.

कोल्हापूरच्या सारथी विद्यार्थी कृती समिती तर्फे किल्ले गोवागड येथे १८००, कनकदुर्ग येथे १००० आणि फत्तेगड येथे १२०० असे तीन हजार सीडबॉलमार्फत बीजारोपण करण्यात आले. त्यामधे जांभूळ, कोकम, साग, फणस या बियांचा समावेश होता.

सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून गडकिल्ल्यांवर सीडबॉल अभियानामध्ये पीएचडी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. सीडबॉल अभियानामध्ये पीएचडी संशोधक विद्यार्थी अनिल काकडे, सुनील किनगे, इंद्रायणी गवस, श्रोतिक पाटील, ज्ञानेश्वर इंगोले, सौरभ आयरे व मधुमा कदम यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या अभियानासाठी सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे तसेच सारथी प्रकल्प अधिकारी रवींद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow