खेड विधी सेवा समितीतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Jul 3, 2024 - 14:14
 0
खेड विधी सेवा समितीतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

खेड : खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ डॉ. सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनानुसार श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल खेडच्या सभागृहामध्ये बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ आणि अन्न सुरक्षा तसेच जागतिक सायकल दिन या विषयांवर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश २ खेड पी. एस. चांदगुडे यांनी आपल्या देशातील प्रत्येक मुलाला सक्तीचे प्राथमिक शिक्षण मोफत केलेले आहे तर खासगी शाळांनी २५% शिक्षण मोफत द्यावे अशी या कायद्यामध्ये तरतूद केली आहे. या कायद्याने मुलांना जसे अधिकार दिलेले आहेत तसे नेमून दिलेला अभ्यास करत राहणे हे मुलांचे कर्तव्य आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अन्न सुरक्षा हा कायदा असून या कायद्यान्वये शाळांमध्ये मुलांना अल्पोपहार दिला जातो. कारण मुलांची भूक भागवली तर त्यांचे अभ्यासात चांगले लक्ष राहते व ते चांगले शिक्षण घेवू शकतात. खाल्लेले अन्न पचवणे यासाठी व्यायाम करणे आवश्यक असते असे त्यांनी यावेळी मुलांना सांगितले.

दिवाणी न्यायाधीश व स्तर खेड एम. व्ही. तोकले यांनी ३ जून २०१८ पासून जागतिक सायकल दिन साजरा करण्यात येतो. सायकल चालवण्याने शरीर लवचिक बनते. आपल्या शरीराला नियंत्रित करणारा मेंदू व हदय यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी सायकल चालविणे फार महत्वाचे आहे, असे त्यांनी मुलांना सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहजीवन हायस्कूलचे पर्यवेक्षक यु.जी. कांबळे, शिक्षक गोविंद राठोड, शिक्षिका लोखंडे, शिक्षक के. जी. धुत्रे, कांचन साळवी, संदिप जोशी यांनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 03/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow