सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाचे क्रॉसिंग स्थानकात रुपांतर कधी?; राजापूर वासियांचा सवाल

Jul 3, 2024 - 12:03
Jul 3, 2024 - 15:10
 0
सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाचे क्रॉसिंग स्थानकात रुपांतर कधी?; राजापूर वासियांचा सवाल

राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाचे (थांबा) क्रॉसिंग स्थानकात रुपांतर करण्याबाबतचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाने देऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी 'कोरे प्रशासनाकडून पुढील काहीच हालचाल न झाल्याने त्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल तालुक्याच्या पूर्व परिसरातील प्रवासी जनतेकडून विचारले जात आहे. दरम्यान, सौंदळ येथील हॉल्ट स्थानकात सार्वजनिक स्वच्छतागृहासह खराब बनलेला रस्ता आणि अन्य समस्या अधिकच बिकट बनत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही वर्षात कोकण रेल्वेमध्ये अनेक बदल इथले आहेत, विविध सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अत्याधुनिक सेवा मिळाल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण वेगाने झाले आहे. कोकण रेल्वेत सुधारणा होत असतानाच दुसरीकडे मात्र सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाबाबत गेल्या चार वर्षात आवश्यक अशा सुधारणा झालेल्या नसल्याचे वास्तव ठळकपणे अधोरेखीत ठरले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर राजापूर बहुतांशी राजापूर तालुक्याला सोयीचे ठरेल अशा सौंदळ येथे थांबा मिळावा अशी सातत्याने मागणी तालुक्याच्या पूर्व परिसरातून होत होती. तालुकावासीयांच्या सुदैवाने कोकणचे सुपुत्र असलेले सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाले आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात रेल्वेत आमूलाग्र बदल घडविले होते. खास करून कोकणवासीयांना दिलासा देताना कोकण रेल्वे सेवेत विकासात्मक कामे मार्गी लावली होती. त्यामध्ये सौंदळ हॉल्टला मान्यता दिली होती, वर्षभरातच सौंदळ हॉल्टचे काम मार्गी लागून त्याचे उद्‌घाटन ना. प्रभूच्या हस्ते पार पडले होते. त्या नंतर गेल्या तीन वर्षात येथे दोन पॅसेंजर थांबत होत्या. कोरोनाच्या काळात दोन्ही पैसेंजर बंद होत्या, त्यापैकी एक असलेली सावंतवाडी दिवा ही पैसेंजर कोरोना संकट संपताच पूर्ववत सुरू झाली. तिला एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला. मात्र, दुसरी पैसेंजर अद्याप सुरू झालेली नाही.

व्हॉल्ट स्थानक असलेल्या सौदळचे कायमस्वरुपी स्थानकात रुपांतर करण्यात यावे अशी मागणी गेली काही वर्षे सातत्याने सुरू असून संबंधित कोकण रेल्वे प्रशासनाकडे तसे पत्रव्यवहारही करण्यात आले आहेत.

सौंदळ हॉल्टचे नियमित स्थानकात रूपांतर करण्याच्या अडचणी
कोकण रेल्वे मार्गावर अलीकडच्याच काळात सुरू करण्यात आलेले सौंदळ येथील हॉल्ट स्थानक रचनात्मक दृष्टया अवघड असून मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव टाकून उंचावर ते बनविण्यात आले. आहे. तेथे मेन लाईन वरच आलेली गाडी थांबते. या स्थानकाच्या एका बाजूला खेटूनच असलेला बोगदा तर दुसऱ्या बाजूला वाहत असलेली अर्जुना नदी स्थानकाच्या विस्ताराला अडथळे ठरत आहेत. भविष्यात येथे कागमस्वरूपी रेल्वे स्थानक बनवायचे असेल तर बाजूला मोठ्या प्रमाणावर माती टाकून त्याची उंची वाढवावी लागेल. त्यावर नवीन लाईन टाकताना आणखी एक बोगद्यासह अर्जुना नदीवर आणखी एक रेल्वे पूल बांधावा लागेल. ही सर्व प्रक्रिया मोठ्या खर्चाची असून संबंधित कोकण रेल्वे प्रशासन या मुद्यांकडे कशा प्रकारे पाहते त्यावरच सौंदळ येथील कायमस्वरूपी स्थानकाचे भवितव्य अवलंबून आहे.

सध्याच्या सौंदळ हॉल्ट स्थानकातील अडचणी
कोकण रेल्वे मार्गावर सौंदळ येथील व्हॉल्ट स्थानकामध्ये मूलभूत सेवांच्या अडीअडचणी आहेत. सौंदळ हॉल्ट स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी असलेला रस्ता अत्यंत खराब आहे. खडी वर आल्याने त्यावरून ये जा करताना प्रवाशांना अडचणी येत आहेत. सुरुवातीच्या काळात या स्थानकामध्ये असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून महिला प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सौंदळ हॉल्ट स्थानकात प्लॅटफॉर्म नसल्याने सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या व सायंकाळी मुंबईकडून येणाऱ्या प्रवाशांना सौंदळ येथे उत्तरताना कसरत करावी लागते. गाडीच्या पावठ ण्यांचा वापर करावा लागतो. सामानासह गाडीत चढताना किंवा उत्तरताना धावपळ करावी लागते. कारण मेन लाईनवरच ट्रेन उभी रहात असल्याने ती जेमतेम एक ते दोन मिनिटे थांबते. या वेळात पॅसेंजरना वेगाने चढ उतार करावा लागतो. राजापूर तालुक्यातील सौंदाळ स्थानकातील या अपूर्ण सेवेमुळे वृद्ध प्रवाशांसह लहान मुलांसमवेत आलेले प्रवासी सौंदळ ऐवजी लगतच असलेल्या विलवडे स्थानकाचा आधार घेतात. मागील काही वर्षात्त सौंदल येथे कायमस्वरूपी नियमित रेल्वे स्टेशन व्हावे, अशी अनेक निवेदने कोकण रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे.

सौंदळ हॉल्ट स्थानकाचे वैशिष्ट्य
सौदळ हॉल्ट स्टेशन हे निसर्ग संपन्न अशा परिसरात असून, सध्या तेथे मुंबईकडे जाणारी व तिकडून देणारी सावंतवाडी दिवा ही एकमेव गाडी थांबते. या गाडीला दोन्ही बाजूने प्रवाशांची चांगली गर्दी असते. सौंदळ स्थानकाच्या निर्मितीनंतर या एका गाडीने चांगले भरमान दिले असून, प्रवाशांना चांगली सुविधा प्राप्त झाली आहे. मुंबई गोवा महामार्गापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर तर ओणी-अणुस्कुरा मार्गालगतच हे स्थानक आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow