रत्नागिरी भैरी मंदिरात तरुणाचा धुडगूस; दोघांना केले जखमी

Jul 2, 2024 - 14:48
 0
रत्नागिरी भैरी मंदिरात तरुणाचा धुडगूस; दोघांना केले जखमी

रत्नागिरी : रत्नगिरीचे ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात आज दुपारच्या सुमारास घडलेल्या एका प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. देवाकडे पाय करून बसलेल्या एका तरुणाला येथील गुरावानी व्यवस्थित बसण्यास सांगितल्याचा रागातून या तरुणाने मंदिरातील गुरवांच्या डोक्यात घंटा घालून जखमी केले आहे. 

यानंतर हा तरुण थेट गाभाऱ्यात शिरला व श्री भैरी देवाच्या बाजूला जाऊन बसला. याला बाहेर काढण्यास गेलेल्या दुसऱ्या गुरावाच्या डोक्यात या तरुणाने उदबत्ती लावण्याचे भाडे मारल्याने दुखापत झाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेले चंदू गुरव व समीर गुरव या दोघांना देखील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले असून यातील एकाच्या डोक्याला टाके पडल्याची माहिती मिळत आहे. 

आता हे प्रकरण पोलीस स्थानकापर्यंत पोहचले असून याबाबतचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. रत्नागिरीचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री देव भैरी मंदिरात घडलेल्या या घटनेमुळे भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:17 02-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow