खेड : गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला

Jul 4, 2024 - 11:12
 0
खेड : गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात बुधवारी मुंबई-गोवा (दि.३) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून लोटे औद्योगिक वसाहतीत हायड्रोजन गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून दरीत कोसळला. या अपघात चालक जखमी झाला असून पोलिसांनी त्याला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक हाफिजूर रेहमान हा त्याच्या ताब्यातील ट्रक (एम. एच. ०५ ए. एम. २२१४) मधून हायड्रोजन गॅस भरलेले सिलिंडर घेऊन मुंबईहून लोटे औद्योगिक वसाहतीच्या दिशेने निघाला होता. बुधवारी दि. ३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात हा ट्रक पोलादपूर बाजूला भोगाव येथे घाट चढत असताना अचानक ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक मागे येऊन दरीत कोसळला. 

या दुर्घटनेची माहिती मिळताच कशेडी पोलीस मदत केंद्रातील पोलिस उपनिरीक्षक पी. एस. धडे, कर्मचारी समिल सुर्वे व सहकारी यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलादपूर येथील मदत कर्मी बोलाऊन ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. त्याला उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले. दरम्यान, अपघातग्रसत ट्रकमधील सिलिंडरमध्ये भरलेला वायू ज्वालाग्राही असल्याने काही काळ घाटातील वाहतूक कशेडी बोगद्यामार्गे वळवण्यात आली होती. गॅस सिलेंडर व अपघातग्रस्त ट्रक बाहेर काढण्याल्या नंतर घाटातून वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 04-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow