कशेडी बोगद्यातील निसरडा रस्ता धोकादायक

Sep 9, 2024 - 11:25
Sep 9, 2024 - 15:33
 0
कशेडी बोगद्यातील निसरडा रस्ता धोकादायक

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील गणेशभक्तांचा प्रवास वेगवान अन् आरामदायी झाला असला तरी दुचाकीस्वारांचा जीव टांगणीवर आहे. बोगद्यातील चिखलमय निसरड्या रस्त्यावर दुचाकी घसरून होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. यामुळे कशेडी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात कशेडी वाहतूक पोलिसांची त्रेधातिरपीट उडत असून डोकेदुखी कायम आहे.

कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून चर्चेचा विषय ठरला आहे. बोगद्यात लागलेली गळती थोपवण्यात राष्ट्रीय महामार्ग खाल्याला यश आले असले तरी आतील चिखलमय निसरड्या रस्त्यामुळे दुचाकी घसरत आहेत.

कशेडी बोगद्यातून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईहून गावाकडे येणारे चाकरमानी कशेडी बोगद्यातूनच प्रवास करण्यास पसंती देत आहेत. हजारो वाहनांमुळे पोलादपूर हद्दीतील भोगावनजीक बोगद्यातून मार्गस्थ होण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला होताच पहिल्याच दिवशी तिहेरी अपघात झाला. मुंबईहून प्रवाशांना घेऊन कोकणात येणाऱ्या एका एसटी बसचे चाक बोगद्यातील गटारात फसल्याने वाहतूक थांबली. कशेडी वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून वाहतूक पूर्ववत केली. प्रवास वेगवान झाला असला तरी सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:52 PM 9/9/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow