टीम इंडियाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पाहा Video

Jul 4, 2024 - 14:07
Jul 4, 2024 - 14:59
 0
टीम इंडियाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पाहा Video

नवी दिल्ली : भारतीय संघाच्या विश्वविजेत्या शिलेदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. टीम इंडियाने टी२० विश्वचषकाची फायनल जिंकली.

आफ्रिकेला सात धावांनी मात देत टीम इंडियाने १७ वर्षांनी पुन्हा एकदा टी२० वर्ल्डकप जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर T20 World Cup ची ट्रॉफी घेऊन टीम इंडिया (Indian Cricket Team) आज मायदेशी परतली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, इतर खेळाडू, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, त्याचा सपोर्ट स्टाफ आणि इतर स्टाफ यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टीम इंडियाने घेतलेल्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये PM मोदी यांनी विश्वचषक ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंसह फोटो काढला. तसेच खेळाडूंनी जवळपास दीड तास मोदींशी गप्पा मारताना विश्वचषकातील आठवणींना उजाळा दिला. 

भारतीय संघ पहाटे बार्बाडोसवरून साडेचारच्या सुमारास विशेष विमानाने भारताच्या दिशेने रवाना झाला. भारतीय संघाला मायदेशी आणण्यासाठी विशेष विमान बार्बाडोसला पाठवण्यात आले. त्याचा व्हिडिओ वृत्तसंस्थेने शेअर केला होता. AIC24WC (Air India Champions 24 World Cup) नावाचे एअर इंडियाचे विशेष चार्टर विमान तेथे गेले होते. भारतीय संघ, त्यांचे सहाय्यक कर्मचारी, खेळाडूंचे कुटुंबीय आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) काही अधिकारी आणि भारतीय प्रसारमाध्यमे यांना परत आणण्यासाठी हे विमान पाठवले होते. चक्रीवादळामुळे हे सर्व जण तेथे अडकून पडले होते. अखेर आज भारतीय संघ सकाळी ६ वाजता भारतात दाखल झाला. दिल्लीकरांचे स्वागत स्वीकारल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यानंतर विजय मिरवणुकीसाठी संघ मुंबईला रवाना झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 04-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow