राजापूर : दळे येथील स्मशानशेडची दुरवस्था

May 29, 2024 - 12:42
 0
राजापूर : दळे येथील स्मशानशेडची दुरवस्था

नाटे : राजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दळे येथील स्मशानशेडची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दळे येथील लासेवाडी, धरणवाडी, गिरकरवाडी, आडीवाडी या सर्व वाडीतील लोकांसाठी असलेल्या स्मशान शेडवरील पत्रे उडालेले असून, एक-दोन पत्रे लटकलेल्या अवस्थेत आहेत. गेले काही वर्षे या स्मशानशेडची अशीच दुरवस्था झालेली असून, प्रशासनाकडे मागणी करूनदेखील पत्रे टाकण्याचे काम देखील झालेले नाही. या स्मशानशेडची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात चिता पेटवणे कठीण होणार आहे. त्यामुळे या स्मशानशेडची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 29-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow