रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल १५ ऑगस्टपासून सुरू होण्यासाठी प्रयत्न

Jul 10, 2024 - 14:12
Jul 10, 2024 - 14:17
 0
रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल १५ ऑगस्टपासून सुरू होण्यासाठी प्रयत्न

रत्नागिरी : रत्नागिरीकरांचे मोफत आरोग्य सेवेचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल १५ ऑगस्टपासून सुरू करण्यासाठी नेटाने प्रयत्न सुरू आहेत. चर्मालय रोड येथे हे हॉस्पिटल सुरू होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून आता लवकरच रत्नागिरीकरांना मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीकरांना मोफत आरोग्य सेवा देणारे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देण्याचे वचन दिले होते. रत्नागिरी नगर परिषदेच्या चर्मालय रोडवरील दवाखान्याच्या इमारतीत हे हॉस्पिटल सुरू करण्याचे निश्चित झाले. ठाण्यातील साधना फाऊंडेशन ट्रस्टला हे हॉस्पिटल चालवण्यास दिले जाणार आहे. हॉस्पिटलसाठी आवश्यक असणारी अंतर्गत कामे केली जात आहेत. एक्स-रे, ऑपरेशन थिएटर, मेडिकल स्टोअर अशा आवश्यक कामांची पूर्तता करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासनाच्या योजनेंतर्गत ज्या उपचार, सेवा, शस्त्रक्रिया आहेत त्या सर्व येथे मोफत मिळणार आहेत. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या तपासण्यासुद्धा या ठिकाणी मोफत केल्या जाणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत हे हॉस्पिटल स्वातंत्र्यदिनापासून सुरू होण्यासाठी आग्रही आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow