खासदार नारायण राणे यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Jul 11, 2024 - 09:49
Jul 11, 2024 - 10:02
 0
खासदार नारायण राणे यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

रत्नागिरी :  रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या रत्नागिरी जिल्हा संपर्क कार्यालयाचा शुभारंभ खा. राणे यांच्या हस्ते बुधवारी झाला.

रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथील अपना बाजारच्या शेजारी मुख्य मार्गावर हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. खासदार राणे यांनी श्रीफळ वाढवून कार्यालयाचा शुभारंभ केला. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड. विलास पाटणे, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण, संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यालयातून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच मतदारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही, असे खा. राणे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 11/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow