खेड : कर्जीतील तांबे कुटुंबाला मदत करण्याच्या आ. भास्कर जाधव यांच्या सूचना

Jul 11, 2024 - 11:09
Jul 11, 2024 - 12:24
 0
खेड : कर्जीतील तांबे कुटुंबाला मदत करण्याच्या आ. भास्कर जाधव यांच्या सूचना

खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील कर्जी गावातील सलीम अब्बास तांबे यांच्या घरावर भलीमोठी दरड कोसळल्याने घराचे नुकसान झाले आहे. सलीम तांबे यांना तत्काळ आवश्यक ती शासकीय आर्थिक मदत करुन त्यांचे कुटुंबाचे राहण्याच्या व्यवस्थेबाबत नियोजन करावे.

अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये नुकसान झाले आहे. यामध्ये नागरिकांची घरे बाधित झाली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी गेल्यामुळे शेती वाहून गेली आहे. तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळणेच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी. अशा सूचना गुहागर तालुक्याचे आमदार भास्कर जाधव यांनी खेड तहसीलदारांना केल्या आहेत.

नुकसानीबाबत ग्रामस्थांनी आमदार भास्कर जाधव यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधून माहिती दिली होती. आमदार जाधव हे स्वतः राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे मुंबई येथे असल्याकारणामुळे तहसीलदारांना सूचना केल्या आहेत. तहसीलदारांनी पंचनामे व मदत याबाबत लक्ष घालून सहकार्य करावे. झालेल्या नुकसानीमध्ये छोट्या मोठ्या घटकांचे देखील तत्काळ पंचनामे करुन जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन खात्याचे सचिव यांच्याकडे माहिती सादर करुन मदत मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 11/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow