संगमेश्वर : फणसवणे ग्रामस्थांनी स्वखर्चाने उभारली प्रवासी निवारा शेड

Sep 17, 2024 - 15:28
 0
संगमेश्वर : फणसवणे  ग्रामस्थांनी स्वखर्चाने उभारली प्रवासी निवारा शेड

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत फणसवणे गुरववाडी येथील स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांच्या सहकार्याने अंत्रवली रस्त्यावर गुरववाडी फाट्याजवळ स्वः खचनि प्रवासी निवारा शेड उभारण्यात आली आहे. यामुळे येथील प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.

फणसवणे महसूल गाव जरी एक असला तरी ग्रामपंचायत कार्यालये दोन आहेत. त्यापैकी ग्रामपंचायत गुरववाडी गाव हा सुमारे साडेतीनशे लोकवस्ती असलेला छोटा गाव आहे. याठिकाणी बौद्धवाडी, गुरववाडी, वालदे, गराटे, आणि ब्राम्हण वाड्या आहेत. या गावासाठी एस. टी. महामंडळाच्या गाड्या असून, त्यापैकी दोन गाड्या या वाड्या शेम्बवणे करीत असल्याने प्रवाशांना ऊन पावसात लांबेवाडी फाट्यावर उभे राहावे लागत असे. या ठिकाणी प्रवासी निवारा शेड व्हावी म्हणून गेली अनेक वर्षांची मागणी होती. त्याला गावातील लांबे कुटुंबीयांनी प्रतिसाद देत, पै. इब्राहिम महंमद लांबे आणि जहिरा इब्राहिम लांबे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र इरफान, सज्जाद आणि साजिद इब्राहिम लांबे तर त्यांची मुलगी समीरा शकील पाटणकर यांनी विना मोबदला जमीन दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow