लांजा : माचाळ-हुंबरवणे रस्त्याच्या दुतर्फा आज वृक्षारोपण

Jul 12, 2024 - 10:21
 0
लांजा : माचाळ-हुंबरवणे रस्त्याच्या दुतर्फा आज वृक्षारोपण

लांजा : लांजा तालुका ग्रामसेवक युनियन आणि पंचायत समिती लांजा यांच्यावतीने शुक्रवारी माचाळ पर्यटन ठिकाणी हुंबरवणे ते माचाळ रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लावगडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

लांजा तालुक्यातील माचाळ या पर्यटन गावामध्ये पावसाळी व उन्हाळी, हिवाळ्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. सध्या पावसाळा सुरू झाल्याने माचाळचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालू लागले आहे. सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वत रांगा, थंडगार वारा, छोटे-मोठे धबधबे, अचानक नजरेला पडणारे पशु-पक्षी, पावसाळी धुके हे सर्व आल्हाददायी वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे. पावसाळ्यामध्ये माचाळ येथे पर्यटकांची संख्या दरदिवशी वाढत आहे. माचाळ गावच्या आणि सह्याद्रीच्या पायथ्याला असलेलं हुंबरवणे गावपासून रस्त्याच्या लगत पुरेशी झाडे नसल्याने त्याठिकाणी लांजा तालुका ग्रामसेवक युनियन आणि पंचायत समिती लांजा यांच्यावतीने आज वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार हे उपस्थित राहणार आहेत. माचाळ या पर्यटन गावच्या रस्त्याच्या बाजूला औषधी वनस्पती आणि उपयोगी झाडे यांची लागवड करण्यात येणार आहे. प्रभारी गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 12-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow