रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'

Jul 17, 2024 - 09:37
Jul 17, 2024 - 09:45
 0
रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'

रत्नागिरी : दोन दिवसापासून पावसाचा जोर ओसरला असला तरी अरबी सागरासह बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र सक्रीय असल्याने कोकण किनारपट्टी भागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात 'रेड' तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेले दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली. सुमारे कोट्यवधी रुपयांची हानी करणाऱ्या पावसाने मंगळवारी सकाळपासूनच उसंत घेतल्याने अनेक भागात निर्माण झालेली पूरस्थिती ओसरला. गेल्या रविवारपाठोपाठ सोमवारी रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामध्ये जिल्ह्यात कोट्यवधी मालमत्तेची हानी झाली तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. सरासरी सव्वाशे मि.मी. च्या सरासरीने पाऊस झाल्याने बहुतांश तालुक्यातील सुमारे दीडशेहून अधिक गावे पाण्यानी वेढली होती तर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोका पातळी गाठली होती. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली तर काही भागात हलक्या सरींनी हजेरी लावत पावसाचा जोर ओसरलेलाच राहिला. त्यामुळे अनेक भागात उद्भावलेली पूरस्थिती ओसरण्यास मदत झाली. त्यामुळे येथील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले. जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे १ जूनपासून १६०० मि.मी. च्या सरसारीने १४ हजार ३११ मि.मी एकूण पावसाची नोंद झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow