खेडमधील लोकअदालतमध्ये ८७ प्रकरणे निकाली; ६८ लाखांची सामोपचाराने तडजोड

Jul 29, 2024 - 14:29
 0
खेडमधील लोकअदालतमध्ये ८७ प्रकरणे निकाली; ६८ लाखांची सामोपचाराने तडजोड

खेड : खेड येथे झालेल्या लोकअदालतीमध्ये एकूण ८७ प्रकरणांमध्ये ६८ लाखांची तडजोडीने निकाली झाली. 

या लोकअदालतमध्ये ७७ प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच वादपूर्व १० प्रकरणे तडजोडीने सामंजस्याने निकाली निघाली. त्यामुळे पक्षकारांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय टळला, अशी माहिती खेड जिल्हा न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी खेड तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून दिली.

या लोकअदालतमध्ये न्यायाधीश व वकिलांचे सहा पॅनेलचे नियोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीचे कामकाज जिल्हा न्यायाधीश - १ डॉ. सुधीर देशपांडे, जिल्हा न्यायाधीश २ पी. एस. चांदगुडे, दिवाणी न्यायाधीश एन. एस. तोकले, जी. एस. दिवाण, एस. एम. चव्हाण, मनिषा पाटील तसेच पॅनल विधीज्ञ सतीश नाईक, ए. डी. चाळके, फरमान मेटकर, सिद्धेश बुटाला, स्वरुप थरवळ, अंकिता गमरे यांनी पाहिले.

खेड येथील वकील व पोलीस कर्मचारी यांनी ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती खेड यांना मोलाचे सहकार्य केले. लोक अदालतच्या दिवशी जोशी, अंधारे यांनी व्यवस्थापन पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:58 29-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow