रत्नागिरी : भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय

Jul 13, 2024 - 10:06
Jul 13, 2024 - 10:09
 0
रत्नागिरी :  भाजपा जिल्हाध्यक्ष  राजेश  सावंत यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत टीडीएस रिटर्न आणि आधार व पॅन लिंक न केल्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या वेतनातूनच ६० ते ७० हजार रुपयांची वसुली एसटी महामंडळाने लावल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी एसटी विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन विभाग नियंत्रक प्रदेश बोरसे यांनी दिले.

एस. टी. कर्मचाऱ्यांना आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मे २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने ते लिंक करून घेणे आवश्यक होते. ही माहिती टी.डी.एस. द्वारे शासनाला दिली गेली. परंतु टीडीएस रिटर्न दाखल करण्याची मुदत आणि आधार  आणि पॅन लिंक करण्याची मुदत ३१ मे २०२४ असताना त्यापूर्वीच म्हणजे कर्मचाऱ्यांनी आधार पॅन लिंक करण्यापूर्वीच रत्नागिरी एस. टी. महामंडळ कार्यालयाने टीडीएस रिटर्न दाखल केले. यावेळी इन्कम टॅक्स विभागाला आधार आणि पॅनलिंक नसणाऱ्या कर्मचा-यांची देखील माहिती देण्यात आली. त्यामुळे टी. डी. एस. ची नोटीस एस. टी. महामंडळाला आली. मग एस. टी. महामंडळाने ज्यांचे आधार आणि पॅन लिंक नाही अशा कर्मचाऱ्यांवर हा भुद्रंड लावला आणि ६०,००० से ७०,००० रुपये कर्मचाऱ्यांकडून जून व जुलै महिन्याच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे प्रती कर्मचाऱ्यांचे ३०,००० तर कोणाचे ३५,००० याप्रमाणे पगारातून कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मुळातच कमी पगार असल्याने कर्मचा-यांचे नुकसान होत होते. अनेकांची कर्ज प्रकरणे, शालेय खर्चाचे करायचे काय याबाबत कर्मचाऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिला. ही बाब तेथील कर्मचाऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. कोणतीही पूर्व कल्पना न देता ही वसुली लावल्याने कर्मचा-यांमध्ये नाराजी पहायला मिळत होती. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही न्याय मिळाला नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी तातडीने आपल्या पदाधिकाऱ्यांसह विभाग नियंत्रक प्रशेश बोरसे यांची भेट घेतली व याबाबत सविस्तर चर्चा केली महामंडळाने कर्मचाऱ्यांवर वसुली न लावता सदर नोटिसीचा अभ्यास करून टॅक्स मार्गदर्शन यांच्याकडून मार्गदर्शन घ्या व उपाययोजना करा, असे अधिकारी बोरसे यांना सांगितले. 

याबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेतो आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून टॅक्स वसुलीची नोटीस मागे घेतो. यातून काहीतरी मार्ग काढूया, असा सुवर्ण मार्ग काढण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रयत्नांमुळे एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पगारातून होणारी ही वसुली थांबणार असल्याने एस.टी. कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह तालुकाध्यक्ष दादा दळी, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, युवा तालुकाध्यक्ष संकेत कदम, कर सल्लागार प्रदीप पटवर्धन उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow