वेरळ येथून बेपत्ता तरुणाचा जगबुडी नदीत मृतदेह आढळला

Jul 13, 2024 - 10:13
 0
वेरळ येथून बेपत्ता तरुणाचा जगबुडी नदीत मृतदेह आढळला

खेड : तालुक्यातील वेरळ येथून बुधवारी बेपत्ता झालेल्या तरुणाचा दोन दिवसांनी शुक्रवारी (दि.१२) जगबुडी नदी पात्रात मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह नदीपात्राबाहेर काढला असून शवविच्छेदन अहवालासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे पाठवला.

खेड तालुक्यातील वेरळ येथून बुधवारी (दि.१०) सकाळी ६ वाजल्यापासून तुषार मनोहर त्रिपाठी हा तरुण घरात कोणाला काही न सांगता बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा शोध त्याचे नातेवाईक व मित्र घेत होते. शुक्रवारी (दि.१२) जगबुडी नदी पात्रात भोस्ते पूलनजीक दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह तरंगत आल्याचे काही लोकांनी पाहिले. त्यांनंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. यावेळी स्थानिक विसर्जन कट्टा या टीमचे सदस्य गणेश खेडेकर व सहकारी यांनी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात उतरून मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना सहकार्य केलं. नदी पात्रात सापडलेला मृतदेह हा वेरळ येथून बेपत्ता झालेल्या तुषार त्रिपाठी या तरुणाचा आल्याची बाब उघड झाली असून त्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्यू ची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 13-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow