हेल्थ एटीएमद्वारे होणार रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य तपासणी

Aug 3, 2024 - 11:04
 0
हेल्थ एटीएमद्वारे होणार रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य तपासणी

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या मिनी दवाखान्यात हेल्थ एटीएम मशीन दाखल झाली आहे, याद्वारे कर्मचारी, अधिकारी, अभ्यांगात यांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील २९ ठिकाणी हे मशीन कर्यान्वित करण्यात आले आहे. याचा लाभही नागरिकांना मिळणार आहे.

जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे अधिकारी च कर्मचारी तसेच कामानिमित्त जि.प. भवनात येणारे अभ्यंगत पत्रकार यांना आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने गेल्या महिन्यात छोटासा दवाखाना थाटण्यात आला होता, या दवाखान्यात डॉ. देविदास चरके हे वैद्यकीय अधिकारी आहेत. दिवसभरात २० ते २५ जणांची याठिकाणी आरोग्य तपासणी करन त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले जात आहेत.

त्या दवाखान्यात आता हेल्थ टीएम मशीन बसवण्यात आली आहे. शुक्रवारारासून या मशीनवर आरोग्य तपासणी केली जात आहे. यामुळे आता कर्मचारी, अधिकारी, पत्रकार, अभ्यांगत यांची मशीनद्वारे तपासणी केली जाणार आहे. या मशीनसाठी तज्ज्ञ कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शुक्रवारी जि.प. भवनात ही मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके, माध्यम अधिकारी ए.जी. बेंडकुळे, औषध निर्माण अधिकारी डी. व्ही. जाभय, सहायक लेखाधिकारी राजू जाधव, चंद्रकांत सरवदे, शिवा यादव, आरोग्य सेविका कडवईकर यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते

या मशीनबरोबरत्च जिल्ह्यात अजूनही मशीन दाखल झाली आहे. एकूण ३० मशीन आल्या होत्या, त्यापैकी एक मशीन जिल्हा परिषदेमध्ये उर्वरीत २९ आरोग्य केंद्रात देण्यात आल्या आहेत. 

यामध्ये मंडणगड कुंपळे, दापोली उंबर्ले पिसंई, खेड कळे, कोरेगाव, वावे, लोटे, तिसंगी, गुहागर आबलोली, हेदवी, तळवली, चिपळूण रामपुर शिरगाव, सावर्डे, वहाळ, संगमेश्वर माखजन, कडवई, साखरपा, रानागिरी कोतकडे, मालगुंड, वाटद, जाकादेवी, पावस, चांदेराई, लांजा-भांबेड वाडिलिबू, राजापूर ओणी, कुंभवडे, या धारतळे आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. याठिकाणी ही मशीन कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow