चिपळुण : वटपौर्णिमेसाठी मिळणार वडाची रोपे; लाभ घेण्याचे आवाहन

Jun 18, 2024 - 15:45
 0
चिपळुण : वटपौर्णिमेसाठी मिळणार वडाची रोपे; लाभ घेण्याचे आवाहन

चिपळूण : वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची फांदी आणून त्याचे पूजन केले जाते. मात्र, दुसऱ्या दिवशी ही फांदी कचऱ्यात फेकली जाते. त्यामुळे असे न करता स्त्रियांनी वडाचे रोप आणून त्याची पूजा करावी व ते योग्य ठिकाणी लावावे. यासाठी दि. १८ ते २१ जून दरम्यान श्री देव जुना कालभैरव मंदिराच्या प्रांगणात वडाची रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शहरातील सहेली ग्रुप, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, अॅक्टीव्ह ग्रुप तसेच श्री देव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. 

शहरातील बाजारपेठेत ग्रामीण भागातून वडाच्या फांद्या विक्रीसाठी आणल्या जातात. मात्र, दुसऱ्या दिवशी ही फांदी कचऱ्यात टाकण्यात येते. त्यामुळे त्याचे पावित्र राखले जात नाही. तसेच वृक्षाची हानी होते. त्यामुळे यावर्षी वटपौर्णिमच्या पूजनासाठी वटवृक्षाचे रोप महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:12 PM 18/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow