चिपळूण : महामार्गावरील डी. बी. जे. कॉलेज येथील संरक्षक भिंती कोसळली
चिपळूण : शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील डी. बी. जे. कॉलेजलगत बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवरील चिऱ्याचे बांधकाम आज (दि. १२) सकाळी अचानकपणे कोसळले. यामध्ये रस्त्त्यालगत असणाऱ्या टपऱ्यांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणताही विद्यार्थी यामध्ये जखमी झाला नाही.
शुक्रवारी (दि. १२) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील डी. बी. जे. महाविद्यालयातील जांभ्या दगडाच्या बांधकामाचा काही भाग कोसळून काँक्रिट नितीनजीक असणाऱ्या टपऱ्यांचे नुकसान झाले.
गेली दहा वर्षे महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. प्रामुख्याने महामार्ग रूंदीकरण दरम्यान होणारे अपघात, घटना व दुर्घटनांचा फटका चिपळूण शहराला बसत आहे. गतवर्षी निर्माणाधीन उड्डाणपुलाचे गर्डर कोसळून मोठी दुर्घटना घडली. गतवर्षीच्या काही घटनेत नागरी वस्तीसह काम सुरू असलेल्या ठिकाणी दरडी कोसळून काहींचे नुकसान झाले होते. उड्डाणपुल दुर्घटनेत पाहणी करण्यासाठी गेलेले लोकप्रतिनिधी सावध असल्याने स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत गर्डरच्या खांबाची बाजू कापताना झालेल्या अपघातामुळे दोन कामगार जखमी झाले. अशा प्रकारे दुर्घटनांची मालिका सुरू आहे.
शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान महामार्गानजीक उभारण्यात आलेल्या कॉक्रिटच्या संरक्षक भितीवरील महाविद्यालयाने बांधलेल्या जांभ्या दगडाचे बांधकाम कोसळले. हा भाग मूळ महामार्गानजीक महाविद्यालयाच्या जागेला संरक्षक भिंत म्हणून उभारलेल्या सुमारे वीस फूट उंचीच्या काँक्रिट भितीवर होता. शुक्रवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हा भाग महामार्गाच्या बाजूला असलेल्या गटारांवरील तीन-चार टपऱ्यांवर कोसळला. परिणामी, टपऱ्यांचे नुकसान झाले तर मैदानातील माती व भिंतीचा जांभा पाण्याच्या झोताबरोबर काही प्रमाणात महामार्गाच्च्या लगतच पसरला, परिणामी वाहतूक असुरक्षित बनली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 13/Jul/2024
What's Your Reaction?