दापोली : मुख्य रोडवरील मासळी बाजारावर कारवाई

Jul 13, 2024 - 11:33
 0
दापोली :  मुख्य रोडवरील  मासळी बाजारावर कारवाई

दापोली : दापोली-मंडणगड रोडवर होत असलेली मासळी विक्री आणि त्या मासळीची दुर्गंधी यामुळे रोगराई पसरू शकते अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. याची दखल दापोली नगर पंचायतीने घेतली आणि सुरुवातीला या विक्रेत्यांना समज दिली. मात्र, तरीही बाजार सुरूच आहे. याबाबत ११ रोजी नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी मासळी विक्रेत्यांच्या टोपल्या उचलल्या, तरीही मासळी बाजार जैसे थे आहे.

शहरातील मुख्य मार्ग असलेल्या मंडणगड रोडवर मासळी विक्रेत्यांनी ठिय्या मांडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. दापोली नगर पंचायतीने घेत या विक्रेत्यांना समज देत कारवाई केली. मात्र, तरीही या मार्गावर मासळी विक्री होत आहे. पावसाळा असल्याने विविध साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. त्यात ही मासळीची दुर्गंधी आणखी आजार वाढवेल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. २० ते २५ मासळी विक्रेत्या महिला मासळी मार्केट सोडून या मुख्य मार्गावर बसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला कायम अडथळा होत आहे. त्यामुळे आता दापोली नगर पंचायत नेमकं कारवाईचं कोणतं पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow