कोयना प्रकल्पातील महानिर्मिती कंपनीत ५३५ कर्मचारी व अधिकाऱ्यांची वेतनवाढ

Jul 13, 2024 - 11:59
 0
कोयना प्रकल्पातील  महानिर्मिती  कंपनीत  ५३५  कर्मचारी व अधिकाऱ्यांची  वेतनवाढ

चिपळूण : विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनवाढीचा पोफळी येथे कोयना प्रकल्पात कार्यरत असलेल्या महानिर्मिती कंपनीतील ५३५ कर्मचारी व अधिकाऱ्यांना लाभ मिळणार आहे. वेतनवाढीच्या प्रस्तावावर मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्या. त्यामुळे वीज कामगार आणि अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महानिर्मिती कंपनी, महावितरण, महापारेषण या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली होती. त्यानंतर पोफळी येथे महानिर्मिती कंपनीच्या कामगार व अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. विविध कामगार संघटनांनी आपल्या सूचना फलकांवर अभिनंदनचे फलक लावले होते. पोफळी येथील कोयना प्रकल्प महानिर्मिती कंपनीने चालवण्यासाठी घेतले आहे.

कोयना प्रकल्पाचे ४ टप्पे महानिर्मिती कंपनीमार्फत चालविले जातात. हा प्रकल्प चालवण्यासाठी पोफळी येथे ५३५ कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. या सर्वांना वेतनवाढीचा फायदा होणार आहे.

ऊर्जा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनवाढीचे आम्ही सर्व स्वागत करतो आणि सरकारचे अभिनंदन करतो. सरकारने उर्वरित मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात संतोष घाडगे, केंद्रीय उपाध्यक्ष, विद्युत कामगार संघटना, पोफळी

अशी होणार पगारवाढ
नवीन वेतनवाढीनुसार तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना किमान ९ हजार रुपये, द्वितीय श्रेणीतील कर्मचारी-अधिकाऱ्यांना किमान ११ हजार रुपये तर प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांना किमान २४ हजार रुपयांची वाढ होणार आहे तसेच तीन वर्षांच्या कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या सहायक कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये वाढ करण्यात आली असून, लाईनवर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow