रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीवर अजय बिरवटकर यांची नियुक्ती

Jul 13, 2024 - 11:20
Jul 13, 2024 - 12:33
 0
रत्नागिरी :   जिल्हा नियोजन समितीवर अजय बिरवटकर यांची नियुक्ती

खेड : महाराष्ट्र यादव ट्रस्टचे अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे राज्य सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते अजय बिरवटकर यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे. अजय बिरवटकर हे मागील काही वर्षे सातत्याने सामाजिक कामात अग्रेसर आहेत. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे ते निकटवर्तीय आहेत. त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांची ही निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी फुरुस जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांनी अनेक गावातील ग्रामस्थांचे प्रश्न सोडवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow