चाफवली गावात अज्ञातवासात पांडवांनी चाफनाथ मंदिर बांधल्याची आख्यायिका

Aug 12, 2024 - 13:14
Aug 12, 2024 - 13:18
 0
चाफवली गावात अज्ञातवासात पांडवांनी चाफनाथ मंदिर बांधल्याची आख्यायिका

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील चापनाथ शिवमंदिर हे श्रावणात भाविकांचे श्रद्धास्थान ठरत आहे. मंदिराचा पांडवकालीन इतिहास आणि मंदिराला लागून काहणारे दोन धबधबे हे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर देवळे गावातून पुढे आले की चाफवली हे गाव लागते. या गावात असलेले चाफनाथ शिवमंदिर हे श्रावण महिन्यात तालुक्यातील भक्तांचे आकर्षण ठरत असते. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात हे मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे. चिऱ्याच्या अखंड शिळेतून हे मंदिर कोरून काढले आहे. मंदिरातीत पिंडीवर अभिषेक व्हावा यासाठी पांडव मागच्या डोंगरातून पाट काढणार होते, पण सुमरा नामक राक्षसीणीने कोंबडा आरवल्याचा आवाज काढला आणि पांडवांनी काम थांबवते, अशी आख्यायिका सांगते,

अज्ञातवासाच्या काळात निघून जाण्यासाठी म्हणून पांडवांनी पाच भुयारेही खणली होती. ही भुयारे आजही स्पष्ट पहावयास मिळतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणायण आणि उत्तरायण अशा दोन्ही पर्वांत रोज संध्याकाळी शिवपिंडीवर किरणोत्सव होतो.

धबधबाही प्रसिद्ध
चाफनाथ मंदिर हे संगमेश्वर तालुक्यात प्रसिद्ध आहे. श्रावणी सोमवारी ह्या मंदिरात दर्शनासाठी लांबून भाविक येत असतात. मंदिराच्या खाली असलेल्या धबधब्यावर जाण्यासाठी चीरयाची पाखाडी बांधली असल्यामुळे धबधब्यावर जाणे सहज शक्य होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:43 PM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow