चिपळुण : शिवरायांचा अश्वारूढ पुतळा ही अभिमानाची बाब : नीलेश राणे
चिपळूण : माजी पालकमंत्री, खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने चिपळुणात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा राहू शकला. यासाठी चिपळूण नगरपालिका, माजी नगरसेवक व नागरिकांचे उत्तम सहकार्य राहिले. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा चिपळुणसारख्या शहरात उभा राहिला. हे माझ्यासारख्या शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.
चिपळूण शहरात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याच्या पाहणी प्रसंगी ते बोलत होते. नीलेश राणे यांनी पालिकेच्या कामाचे राणे कौतुक केले. त्यानंतर सुशोभित नारायण तलावाला भेट देऊन पाहणी केली. चिपळूण पालिकेतर्फे शिवपुतळा येथे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, प्रसाद साडविलकर यांनी राणे त्यांचे स्वागत केले. या वेळी ते म्हणाले, आता पुढील काळात शिवाजी महाराजांचा पुतळा परिसर स्वच्छ राखण्याची सर्वांची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे शिवरायांच्या पुतळ्याचे शिल्पकार चिपळुणमधीलच शिरगावकर आहे. ही कौतुकास्पद बाब आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 26/Aug/2024
What's Your Reaction?